Please Share
नमस्कार वाचकमंडळी
ऐकलात ना?
नमस्कार वाचकमंडळी
काल सकाळी सकाळी रोहन आणि समिधा आमच्या घरी आले.
थोडे वैतागलेलेच होते.
त्यामुळे मी जास्त काही न चौकशी करता मी चहाचा कप हातात देऊन सरळ प्रश्न विचारला, "काय झाले?"
रोहन म्हणजे आमचा Family friend. सुस्वभावी, शांत, हुशार, फारसा समाजामध्ये न मिसळणारा. समिधा त्याची बायको. दोघेही एका multinational कंपनी मध्ये सहा आकडी पगार घेणारे. नमन त्या दोघांच्या संसारवेलीवर फुललेल गोंडस फुल.
"काही नाही हो ताई, आत्ताच नमनच्या शाळेत जाऊन आलो. त्याच्या मिस सांगत होत्या
- याला अजून वाचता येत नाही. phonic words याचे पाठ नाहीत.
- हा अजिबातच एक जागेवर बसत नाही.
- सारखा बडबडत असतो.
- त्याचं सगळ लक्ष बाहेर असते.
- रोज त्याचा homework हि पूर्ण नसतो.
तुम्हीच सांगा याला Senior KG ला कशी admission द्यायची?आणि काय काय सांगत होत्या...आता काय करायचे? त्याचं वर्ष तर वाया जाणार नाही ना? मी याच विचारात होतो, त्यामुळे माझ्या कानात अर्ध्या गोष्टी शिरतच नव्हत्या."
"त्याला शिकवायला आम्हाला वेळ नसतो , म्हणून tution हि लावली आहे."
आता सामिधाने बोलायला सुरवात केली." तिथे जाऊन काय करतो हे विचारायला tution teacher ला फोन केला. तर तीही आम्हालाच शिकवायला लागली. म्हणे त्याचे क्लास कमी करा."
आता ताई तुम्हीच सांगा आजच्या या compitative, Multitasking च्या जगात आमचा मुलगा कुठे मागे पडलेला आम्हाला आवडेल का?
म्हणून त्याला फक्त Drawing, Singing, Dance, Gitar एवढेच hobby क्लास लावलेत.
Swmming, Karate, Football हे physical development आणि
Chess & Abacus हे mental developmaent साठी
आता चक्कर येऊन पडायची माझी वेळ होती. 'एवढे class आहेत त्याला'. अनाहूत पणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"हो ताई, पण हे सगळे आज खूप महत्वाचेच आहे. 21 व्या शतकातील मुलांचे Parenting म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यात 21 century skill development करण म्हणजे Proper planning आणि त्याचं execution खूप महत्वाच असते. आणि समिधा त्यात खूपच Expart आहे." रोहन उत्तरला.
"आणि प्रत्येक क्लास हा आठवड्यातून एकदाच असतो. आम्ही काही त्याला फार tension देत नाही आम्ही रोज त्याचे बरोबर दोन क्लास manage केले आहेत. आता फक्त त्याला बुधवारी वेळ असतो तेव्हा एक तरी foreign laguage आली पाहिजे म्हणून french language चा क्लास लावणार आहोत." सामिधाने माहिती पुरवली.
त्यानंतर त्यांच्याशी थोडी चर्चा करून ते निघून गेले.पण माझे विचारचक्र काही थांबत नव्हते. 4 वर्षाचा नमन काही माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता.
खरच आम्हाला आमच्या मुलांकडून काय हवे असते?
मुलांच्या विकासाची blue print तयार करणे, त्यानुसार प्रयत्न करणे योग्यच आहे. पण म्हणूनच त्यांची परीक्षेतील गुणवत्ता, शिक्षणातील डिग्री, चांगली नोकरी, लठ्ठ पगार ह्या त्यासाठी त्यांचे बालपण दडपण्याचा गुन्हा आपल्या नकळत आपण करतो का? आपल्या अपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला बाधक तर ठरत नाही ना? याचा विचार करणे खूप महत्वाचे असते.
लहान मुलांचे मन हे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. आपण घडवू तसे ते घडत असते. आपल्या प्रतिक्रियांचा त्यांच्यावर खूप परिणाम होत असतो. कसा ते तुम्ही प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांच्या तोंडूनच ऐका.
खरच आम्हाला आमच्या मुलांकडून काय हवे असते?
ते आपला prestige point आहेत का? कि आपली ती म्हातारपणासाठी केलेली Investment?
मुलांच्या विकासाची blue print तयार करणे, त्यानुसार प्रयत्न करणे योग्यच आहे. पण म्हणूनच त्यांची परीक्षेतील गुणवत्ता, शिक्षणातील डिग्री, चांगली नोकरी, लठ्ठ पगार ह्या त्यासाठी त्यांचे बालपण दडपण्याचा गुन्हा आपल्या नकळत आपण करतो का? आपल्या अपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला बाधक तर ठरत नाही ना? याचा विचार करणे खूप महत्वाचे असते.
लहान मुलांचे मन हे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. आपण घडवू तसे ते घडत असते. आपल्या प्रतिक्रियांचा त्यांच्यावर खूप परिणाम होत असतो. कसा ते तुम्ही प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांच्या तोंडूनच ऐका.
लहान मुलांचे निरागस विश्व, त्यांची आनंद घेण्याची तऱ्हा काही वेगळीच असते.
मुक्त वातावरणात घालवलेले ते बालपण खरोखरच खूप रम्य असते. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्याच्या स्वतः विषयीच्या आणि समाजाविषयीच्या संकल्पना तयार होत असतात.
पाया मजबूत असेल तरच उभी राहणारी इमारत पक्की असेल ना?
त्यासाठी मुलांची Learning style कशी ओळखायची आणि त्यानुसार त्याला कोणत्या activity द्यायच्या हे आपण एका Blog मध्ये पहिलेच आहे. आता पुढील काही blog मधून मुलांमध्ये असलेली बहुविध बुद्धिमत्ता, ती कशी ओळखायची, आणि त्यानुसार काही activity यांचा आपण विचार करू
त्यासाठी लवकरच परत भेटू.
अधिक माहितीसाठी तुम्ही मला mail करू शकता.
bye

No comments:
Post a Comment