Thursday, 21 December 2017

Interpersonal intelligence\People smart(आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्ता)

Please Share

नमस्कार
मागील blog पासून आपण एक blog serise सुरु केली आहे. 

त्यामध्ये आपण वाचले कि अमेरिकेतले एक संशोधक हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी 1983 साली बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत(‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’) फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडला.

त्यालाच मराठी मध्ये  ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ असं म्हटलं जांत.

त्यांच्या सिद्धांतानुसार  प्रत्येकात ‘बुद्धिमत्ता एक नाही, तर आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.' 


त्या खालील प्रमाणे....



बहुविध बुध्दिमत्ता( Multiple Intelligences)
  • आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्ता.(Interpersonal intelligence\People smart)
  • व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता.(Intrapersonal\Self Smart)
  • तार्किक-गणिती बुध्दिमत्ता.(Logical-Mathematical\Logic Smart)
  • सांगितिक बुध्दिमत्ता.(Musical\Music Smart)
  • निसर्गविषयक बुध्दिमत्ता.(Naturalistic\Nature Smart)
  • शाब्दिक-भाषिक बुध्दिमत्ता.(Verbal-Linguistic\Word Smart)
  • दृश्य-अवकाशीय बुध्दिमत्ता.(Visual-Spatial\Picture Smart)
  • शारीरिक-गतिमानता विषयक बुध्दिमत्ता.(Bodily-Kinesthetic\Body Smart)
या व्यतिरिक्त इतरही क्षमता अस्तित्वात असण्याची शक्यता ते नाकारत नाहीत. 

चला तर आजपासून आपण एकेक बुध्दिमत्ता, त्या कशा ओळखायच्या ते समजावून घेऊया. त्यानुसार आपण  काय activity करू शकतो. आणि त्याचा आपल्या कसा उपयोग करता येईल याचही विचार करूया.  

  1. आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्ता.(Interpersonal intelligence\People smart)


Image वरून तुमच्या लक्षात आलेच असेल.

आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्ता म्हणजे  इतरांना समजवून घेणे  आणि त्याच्या बरोबर प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता. 

मग अशा व्यक्तीमध्ये खालील गुण असणारच. 
  • प्रभावी शाब्दिक आणि अशाब्दिक संप्रेषण करण्याची कला.
  • इतरांमधील फरक लक्षात ठेवण्याची क्षमता.
  • इतरांच्या मनाची भावना आणि स्वभाव ओळखणे. 
  • वेगवेगळ्या  दृष्टीकोनांमध्ये समन्वय साधण्याची  क्षमता.  
अशा प्रकारचे बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती त्यांच्या समवयस्कांत नेते असतात, संप्रेषणात चांगले असतात आणि इतरांच्या भावना आणि हेतूं समजून घेतात.


या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे प्राधान्य असणाऱ्या व्यक्ती म्हणजे




व्यावसायिक, उद्योजक ,शिक्षक, व्यवस्थापक, राजकारणी नेते, सामाजिक कार्यकर्ते, विक्रेते, समुपदेशक, बालसंगोपक, धर्मगुरू, कलाकार इत्यादी व्यक्तींमध्ये हि गुणवत्ता अधिक प्रमाणात असणे आवश्यक असते. 


त्यामुळेच हि बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी वरील क्षेत्रात आपले करियर करू शकतात. 


हि बुध्दिमत्ता असणाऱ्या व्यक्तींना group मध्ये काम करायला, group चे नेतृत्व करायला आवडते. आपले म्हणणे पटवून देणे, वादविवाद मिटवणे हे ह्यांचे positive point    असतात. 



Activities to strengthen interpersonal intelligence of your child.

1. Asign some group activities like making fort, project for social awareness.  These type of activites are  not only for fun but it gives opportunity to practice creativity and interpersonal intelligence.

2. Organize group discussion on study related subjects. Use methods Think -pair -share,brainstroming.  

3. Send them in the weekly market it will enhance interpersonal skill as well as negotiation & money manegment  skill. Now a day which is very important.

4. Join a volunteer or service group oriented.

5. Spend 15 min everyday for a week or two observing how        people interact in public place. (Street corner, train station,      departmental store etc.)

6. Allow  peer tutoring or cross age tutoring.

7. Motivate Co-operative learning.

8. Tell them to take interview of socially competent        individuals  to understand their life.

9. Take Group test.

10. Form science, math club & tell them to write their own skit & perform drama to explain complicated concept in that subject.

And more you can do.

आणि जर नवीन काही केलं तर  मला कळवायला विसरू नका. 
मी अभिप्रायांची वाट पाहते आहे.



bye.......लवकरच परत  भेटू. एक नवीन बुध्दिमत्ता जाणून घेण्यासाठी.  



    Tuesday, 19 December 2017

    बहुविध बुध्दिमत्ता-Introduction

    Please Share

    नमस्कार वाचक मंडळी!!!

    आपण माझ्या blog ला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!!!


    मुलांची Learning style कशी ओळखायची आणि त्यानुसार त्याला कोणत्या activity द्यायच्या हे आपण एका Blog मध्ये पहिलेच आहे. 

    आता पुढील काही blog मधून मुलांमध्ये असलेली बहुविध बुद्धिमत्ता, ती कशी ओळखायची,आणि त्यानुसार काही activity यांचा आपण विचार करणार आहोत. 


    हा विषयच खूप मोठा असल्यामुळे आपण काही भागांमधून तो वाचणार आहोत. 



    लहान मुलांचे निरागस विश्व, त्यांची आनंद घेण्याची तऱ्हा काही वेगळीच असते.मुक्त वातावरणात घालवलेले ते बालपण खरोखरच खूप रम्य असते. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्याच्या स्वतः विषयीच्या आणि समाजाविषयीच्या संकल्पना तयार होत असतात. 
    मुलांचा जर सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्यांच्यातील सुप्तगुण ओळखणे, त्यांच्यात कोणत्या बुद्धिमत्ता आहेत हे ओळखणे खूप महत्वाचे असते. 
    पाया मजबूत असेल तरच उभी राहणारी इमारत पक्की असेल ना?




    जर आपण आपल्या क्षमतानुसार योग्य जागी नसू तर काय होते हे खालील  गोष्टी मधून वाचा. 
    एकदा एका उंटाच्या मुलाने आपल्या आईशी गप्पा मारताना विचारले .....



     आता आईच ती ! तिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे माहितच असणार. 

    पण इतक्यात प्रश्न संपले नव्हते बर का. बाळराजांकडून दुसरा प्रश्न विचारल्या गेला.


    ओह्ह! असं आहे तर..... 




    आता बाळराजे खुश झाले आणि आईला म्हणाले म्हणजे 


    अगदी बरोबर, आईने खुश होऊन उत्तर दिले. पण आई ..... बाळाचा पुढचा प्रश्न तयार होता. ' आता काय?' आईला जरी सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आली असली तरी जरा कंटाळवाण्या स्वरातच  आईने विचारले. आपल्याही घरी असेच होते ना. बरेचदा मुलांच्या प्रश्नांना आपण कंटाळतो. कधी कधी  मुलांना काय उतार द्यायचे कळतच नाही. मग आपण म्हणतो हि मुले काहीही प्रश्न विचारतात. आणि आपण त्यांना टाळतो. शेवटी उंट बाळाने आईला विचारलेच....



    आता मात्र आई निरुत्तर झाली. तिच्याही मनात कुठे तरी हा विचार तिला बोचत होताच.
    आपल्याही बाबतीत बरेचदा असेच  होते. मनात विचार येतो 'मी शाळेत असताना गाणे किती छान म्हणायचो, किंवा चित्रकला तर मला खूपच आवडायचा. त्यातच जर मी करियर केल असत तर मी मी आज एक वेगळ जीवन जगत असतो.  बरोबर ना? म्हणूनच तर  म्हणतात ना........





    प्रत्येक व्यक्ती मध्ये जन्मतः काही विशीष्ट क्षमता असतात. जर  त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन केले  तर त्या वाढीस लागतात. अमेरिकेतले एक संशोधक हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी 1983 साली बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत(‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’) फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडला.  त्यालाच मराठी मध्ये  ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ असं म्हटलं गेलं. त्यांच्या सिद्धांतानुसार  ‘बुद्धिमत्ता एक नाही, तर अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.' प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असली तरी पेशींची रचना, त्यांची जुळणी ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते

    हा सिद्धांत मांडताना गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. प्रत्येकात त्या कमी किंवा जास्त प्रमाणात असतात. 





    जर आपण  आपल्या  बुद्धिमत्तेनुसार कार्य केल तर ते  काम खूप छान पद्धतीने होते. पण आपल्या  बुद्धिमत्तेच्या विरोधात काही करायला गेल की आपल्या मेंदूवर ताण येतो. त्यामुळे गरज असते ती आपली नैसर्गिक  बुद्धिमत्ता ओळखण्याची. 





    ह्या बुध्दिमत्ता कशा ओळखायच्या आणि स्वतःच्या  तसेच आपल्या मुलांच्या विकासासाठी त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेन.  
    आणि हा प्रश्न अगदी योग्यच  आहे ते कारण एकदा या बुद्धिमत्ता कोणत्या आणि त्या कशा ओळखायच्या  हे आपल्याला  समजलं की आपण आपल्या आणि आपल्या मुला-मुलींच्या बुद्धिमत्ता आपण त्यांच्या लहान वयातहीओळखून त्यांना योग्य प्रकारे संधी पुरवू शकतो, त्यांच्या  नेहमीच्या अभ्यासात जास्त नेमकेपणाने मदत करू शकतो. त्यांना त्याच्या करीयरच्या वाटा शोधायलाही मदत होतेच.तर या प्रत्येक बुद्धीमत्ते बद्दल आपण पुढील काही लेखांमधून सविस्तर माहिती बघू. 

    तोपर्यंत Bye.

    तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.

    .......आणि सुनीताताई Digital झाल्या

    Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...