Wednesday, 29 November 2017

What Do We Want From Our Children?

Please Share

नमस्कार वाचकमंडळी


काल सकाळी सकाळी रोहन आणि समिधा आमच्या घरी आले. 
थोडे वैतागलेलेच होते. 
त्यामुळे मी जास्त काही न चौकशी करता मी चहाचा कप हातात देऊन सरळ प्रश्न विचारला, "काय झाले?" 

रोहन म्हणजे आमचा Family friend. सुस्वभावी, शांत, हुशार,  फारसा समाजामध्ये न मिसळणारा. समिधा त्याची बायको. दोघेही एका multinational कंपनी मध्ये सहा आकडी पगार घेणारे. नमन त्या दोघांच्या संसारवेलीवर फुललेल गोंडस फुल.

"काही नाही हो ताई, आत्ताच नमनच्या शाळेत जाऊन आलो. त्याच्या मिस सांगत होत्या 

  • याला अजून वाचता येत नाही. phonic words याचे पाठ नाहीत. 
  • हा अजिबातच एक जागेवर बसत नाही.
  • सारखा बडबडत असतो.
  • त्याचं सगळ लक्ष बाहेर असते.
  • रोज त्याचा homework हि पूर्ण नसतो. 

तुम्हीच सांगा याला Senior KG ला कशी admission द्यायची?आणि काय काय सांगत होत्या...आता काय करायचे? त्याचं वर्ष तर वाया जाणार नाही ना? मी याच विचारात होतो, त्यामुळे माझ्या कानात अर्ध्या गोष्टी शिरतच नव्हत्या."

"त्याला शिकवायला आम्हाला वेळ  नसतो , म्हणून tution हि लावली आहे."
आता सामिधाने बोलायला सुरवात केली." तिथे जाऊन काय करतो हे विचारायला tution teacher ला फोन केला. तर तीही आम्हालाच शिकवायला लागली. म्हणे त्याचे क्लास कमी करा."


आता ताई तुम्हीच सांगा आजच्या या compitative, Multitasking च्या  जगात आमचा मुलगा कुठे मागे पडलेला आम्हाला आवडेल का? 

म्हणून त्याला फक्त Drawing, Singing, Dance, Gitar एवढेच hobby क्लास लावलेत. 

Swmming, Karate, Football हे physical development आणि

Chess & Abacus हे mental developmaent साठी



   
आता चक्कर येऊन पडायची माझी वेळ होती. 'एवढे class आहेत त्याला'. अनाहूत पणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. 

"हो ताई, पण हे सगळे आज खूप महत्वाचेच आहे. 21 व्या शतकातील मुलांचे Parenting म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यात  21 century skill development करण म्हणजे Proper planning आणि त्याचं execution खूप महत्वाच असते. आणि समिधा त्यात खूपच Expart आहे." रोहन उत्तरला.


"आणि प्रत्येक क्लास हा आठवड्यातून एकदाच असतो. आम्ही काही त्याला फार tension देत नाही आम्ही रोज त्याचे बरोबर दोन क्लास manage केले आहेत. आता फक्त त्याला बुधवारी वेळ असतो तेव्हा एक तरी foreign laguage आली पाहिजे म्हणून french language चा क्लास लावणार आहोत." सामिधाने माहिती पुरवली. 



त्यानंतर त्यांच्याशी थोडी चर्चा करून ते निघून गेले.पण माझे विचारचक्र काही थांबत नव्हते. 4 वर्षाचा नमन काही माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता.

खरच आम्हाला आमच्या मुलांकडून काय हवे असते? 


ते आपला  prestige point आहेत का? कि आपली ती म्हातारपणासाठी केलेली Investment?

मुलांच्या विकासाची blue print तयार करणे, त्यानुसार प्रयत्न करणे योग्यच  आहे.  पण म्हणूनच त्यांची परीक्षेतील गुणवत्ता, शिक्षणातील डिग्री, चांगली नोकरी, लठ्ठ पगार  ह्या त्यासाठी  त्यांचे बालपण दडपण्याचा गुन्हा आपल्या नकळत आपण करतो  का? आपल्या अपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला बाधक तर ठरत नाही ना? याचा विचार करणे खूप महत्वाचे असते.
लहान मुलांचे मन हे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. आपण घडवू तसे ते घडत असते. आपल्या प्रतिक्रियांचा त्यांच्यावर खूप परिणाम होत असतो. कसा ते तुम्ही प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांच्या तोंडूनच ऐका.




ऐकलात ना?

लहान मुलांचे निरागस विश्व, त्यांची आनंद घेण्याची तऱ्हा काही वेगळीच असते. 
मुक्त वातावरणात घालवलेले ते बालपण खरोखरच खूप रम्य असते. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्याच्या स्वतः विषयीच्या आणि समाजाविषयीच्या संकल्पना तयार होत असतात. 
पाया मजबूत असेल तरच उभी राहणारी इमारत पक्की असेल ना?

त्यासाठी मुलांची Learning style कशी ओळखायची आणि त्यानुसार त्याला कोणत्या activity द्यायच्या हे आपण एका Blog मध्ये पहिलेच आहे. आता पुढील काही blog मधून मुलांमध्ये असलेली बहुविध बुद्धिमत्ता, ती कशी ओळखायची,  आणि त्यानुसार काही activity यांचा आपण विचार करू

त्यासाठी लवकरच परत भेटू. 

अधिक माहितीसाठी तुम्ही मला mail करू शकता. 
bye

Monday, 20 November 2017

"मै कर सकती है"

 Please Share

नमस्कार वाचकमंडळी 

कसे आहात सगळे. मजेत ना! 


मस्त गुलाबी थंडी पडायला सुरवात झाली आहे. सगळ्यांसारखाच मलाही पहाटेच्या  'साखरझोपेतून' उठण्याचा कंटाळा येतो. जाग येऊनही अंथरुणातच  पडून रहावेसे  वाटते. रोजचा व्यायाम, योगासने, नंतरची स्वयंपाक घरातील काम  तर नकोशी वाटतात. 
मग  अंथरुणातच माझ्या स्वप्नांच्या दुनियेची सफर सुरु होते. मध्ये कोणाचा व्यत्यय नको म्हणून मग  मी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपण्याचे नाटक  करते.







ही माझी स्वप्नांची दुनिया फार छान असते, एक समारंभ सुरु असतो. एक मोठठ व्यासपीठ असत. दोन मोठे सेलिब्रिटी anchoring करत असतात. व्यासपीठावर छानशी एक Trophy घेऊन एक नामांकित व्यक्ती उभी असते. आणि announcement होते. & The prize goes to ..........






तेवढयात माझ्या लाडक्या युवराजांचा आवाज येतो "मम्मा, आज टिफिन मध्य काहीतरी छान करून दे, भाजीपोळी, पराठे, थालीपीठ, इडली-डोसा,  आंबोळी असं नेहमीच नको." 



'झालं! हीच ती वाक्य असतात जी मला काही करण्यापासून थाबवतात,माझ्या यशापासून मागे खेचतात. नाही तर मी आज कुठल्या कुठे असते हा विचार माझ्या मनात येतो'. 



"हो रे माझ्या राजा,  छान काहीतरी करून देते." असं म्हणत मी त्यालाही माझ्या पांघरुणात ओढते. आणि माझा अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण आता ते माझ अपूर्ण स्वप्न मला दिसतच नाही. माझ्या विचारांचं चक्र आता दुसरीकडेच फिरत असते. 'आज Breakfast मध्ये काय बनवायच? lunch मध्ये काय भाजी करू? चला लवकर उठून आवरायला पाहिजे. आज दुपारी दवाखान्यातही जायचे आहे. पुढल्या आठवड्यात दोन लग्नांना जायचे आहे. त्याही साडीवर matching आणायला जावे लागेल.' ह्या आणि अशाच विचारांनी मी पांघरून बाजूला सारून उठते आणि माझ्या कामाला लागते. 



अशी माझ्या सारखी मोठ-मोठी यशाची स्वप्नं खूप लोकं बघतात पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची धमक फारच थोड्या लोकांमध्ये असते. स्वप्न आणि सत्य या दोन मधला जो एक Bridge असतो तो पार करण्याची हिम्मत काहीच लोक दाखवतात. असं नाही कि आपल्यात क्षमता नसतात. पण त्या योग्य पद्धतीने वापरण्याची आपली तयारी नसते. आपण Safe zone  सोडण्यास घाबरतो. आणि  कारण सांगायला सुरवात करतो.



अडचणी तर काय सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण आपण त्यावर मात करून पुढे जायचे कि त्यांना कुरवाळत बसायचे ते आपण ठरवायचे असते.

यश मिळवायचे म्हणजे परिस्थितीशी झुंज द्यायची तयारी पाहिजे.  







डोळ्यात स्वप्नं  आणि "मै कर सकती है" हा आत्मविश्वास असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू  शकत नाही.





यशस्वी होणे म्हणजे काय तर परीक्षेतील गुणवत्ता, शिक्षणातील डिग्री, चांगली नोकरी, लठ्ठ पगार, त्यामुळे दाराशी येणाऱ्या महागड्या गाड्या, bank balance, सोन्याचांदीचे दागिने घालून मिरवणे. थोडक्यात काय चैनीचे जीवन जगण्याची ऐपत असणे म्हणजेच यश अशी आपली समजूत असते. आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी  लोकांची उदाहरण आपण पाहत असतो. 



पण तेच  खरे यश आहे असे तुम्हाला वाटते का?


आता उदाहरणादाखल सांगायचे झाले तर समजा एखाद्या कडे वरील सर्व गोष्टी आहेत पण त्याची health  चांगली नसते. तर तो या सगळ्यांचा उपभोग घेऊ शकेल का? तो त्याच्या आयुष्यात आनंदी असेल का?
मग त्याला यशस्वी म्हणायचे का?

आज गेली 17 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात वावरते  आहे. विद्यार्थांच्यातोंडून बरेचदा एकले आहे 'Madam, जिवनात खूप यशस्वी व्हायचे आहे.' मग मी त्यांना विचारते म्हणजे नेमके काय करणार आहात?' त्याची उत्तरे मात्र मुलांजवळ नसतात.  
यश म्हणजे काय हे न समजताच, त्यांना यशस्वी व्हायचे असते. आणि मग परीक्षेतील यश म्हणजेच आयुष्यातील यश असे समीकरण तयार होते. जे सर्वस्वी चुकीचे आहे.
तर  आज आपण ‘यश’ म्हणजे काय ते जाणून घेवूया.  

जीवनात ध्येय निश्चित करणे. आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करणे म्हणजेच  यश मिळवणे होय. 

ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नेहमीच अपेक्षित यश मिळेलच असे  नाही, काही वेळा आपण अपयशी ठरतो. समजा एका  विद्यार्थांने आपले ध्येय परीक्षेत 90% मार्क्स मिळवण्याचे ठरवले पण तो ते मिळवू शाळा नाही तर तो अपयशाने  खचून जातो. निराश होतो. कुटुंबाच्या आणि समाजाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाहीत ,आता जगण्यात काही अर्थ उरला नाही त्याला असे वाटू लागते आणि आत्महत्येचे विचार येतात आणि काही जण तसा प्रयत्नही करतात.
पण हा काही समस्येवरचा उपाय नाही.

स्वप्ने पाहणे, मोठी  ध्येय ठेवणे योग्यच आहे.  पण ध्येयपूर्ती साठी   सातत्याने, नियोजनपूर्वक जर  प्रयत्न केले तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आता वरील विद्यार्थ्यांचेच उदाहरण घेवू या. त्याचे ध्येय परीक्षेत 90% मार्क्स मिळवण्याचे आहे. त्याची  बौद्धिक क्षमताही आहे. पण त्याने त्याचा सगळा वेळ Mobile game खेळण्यात घालवला तर त्याला यश मिळेल का? म्हणजेच जर प्रयत्नात सातत्य नसेल, वेळेचे नियोजन केले नसेल तर त्याला यश मिळणार नाही हे नक्की. 
अशा वेळी आपण आपल्या ध्येयपूर्ती साठी किती प्रयत्न केले हे याचे मूल्यमापन होणे गरजेचे असते.

आपल्या कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मनात positive विचार ठेवले की यश हमखास मिळते. 

अपयशानंतरही आत्मविश्वास कायम असेल  तर आपण परिस्थिती बदलू शकतो. आता त्या विद्यार्थ्यांने अपयशाला तोंड देताना आत्मपरीक्षण केले, आपला वेळ mobile game मध्ये न घालवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर त्याला यश नक्कीच मिळेल.

कमतरतांबरोबर आपल्यातील चांगल्या गुणांचे सतत स्मरण ठेवले तर आत्मविश्वास वाढतो. आणि यश हे मिळतेच. 

 यश ही एक वृत्ती आहे ती काही एखादी  घटना नाही. त्यामुळे जर एखाद्या परीक्षेत जर अपयश मिळालेच तर ती परिस्थिती हाताळायचे कौशल्य आत्मसात करा. आणि अभ्यासाला लागा.

Open the following link and read about 50 famous people who failed at their first attempt.


अजूनही वेळ गेलेली नाही. यश मिळवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो, त्याची यादी खूप मोठी आहे. पण आपण  पुढील 10 गोष्टींपासून सुरवात करूया.

  1. तुमचे ध्येय निचित करा. ध्येयपूर्ती दृष्टीने प्रयत्न करा. 
  2. आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी काय अडचणी  येवू  शकतात याची यादी करा. आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा.
  3. स्वतःवर विश्वास ठेवा.
  4. स्वतःच्या क्षमता ओळखा.
  5. वेळेचे नियोजन करा.
  6. अवांतर वाचन करा. 
  7. कोणत्याही अपयशाची कारण सांगू नका, तर आत्मपरीक्षण करा आणि आपल्या कमतरतांवर मात करा.
  8. Yoga, meditation, exercise करा.
  9. Risk घ्यायला शिका.
  10. Positive विचार करा.
आणि मग बघा यश तुमचेच आहे. 

चला लागा कामाला आणि काही विचारायचे असेल तर मी आहेच. 
लवकरच परत भेटू.......




x

Saturday, 4 November 2017

How to develop reading habit in students?

नमस्कार मंडळी 

कसे आहात सगळे, वाचताय ना सगळे. वाचायलाच पाहिजे. 
कारण 'वाचाल तर वाचाल'....
आता तुमच्या  मनात प्रश्न आलाच असेल, हे विचारण्या मागच प्रयोजन काय? 



आम्हाला माहित आहे हे वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. आणि त्यांनी स्वातंत्रपूर्व काळात समाजाला प्रबोधन करण्यासाठी वापरलं होत. 

आणि आम्हाला हेही माहितच आहे कि वाचनाने मानसिक क्षमता वाढतात. व्यक्तीचे विचार समृद्ध होतात. विचारांमध्ये प्रगल्भता येते. आकलन क्षमता वाढते. प्रत्येक गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. स्मरणशक्ती प्रवाही बनते. हे आणि असे अनेक फायदे आहेत वाचनाचे. 

अरे व्वा! छान.

ही खरच खूप चांगली गोष्ट आहे कि तुम्ही  वाचनाचे महत्व जाणता, आणि म्हणूनच तुम्हाला  सारखे वाटते कि मुलांनीही वाचावे, लिहावे. त्यांच्यात वाचण्याची सवय विकसित व्हावी.म्हणून तुम्ही सारखे त्यांच्या मागेही लागता. पण मुलच ती, ऐकणार कशी? 

काय खंर आहे ना?

काही दिवसांपूर्वीपर्यंत माझाही हेच मत होत.

पण ........


काही दिवसांपूवी माझी मैत्रीण प्रिया माझ्या घरी आली होती. तिच्या सोबत तिची मुलगी श्रेया पण होती. अगदी माझ्या मुलाच्याच  वयाची. मला वाटल आता दोघेजण छान काहीतरी खेळतील, मस्त्या करतील, घरभर पसारा करतील. पण करू देत.  तेवढा वेळ आमच्या गप्पा तर होतील. पसारा काय आवरू नंतर.  

दारावरची बेल वाजली. मी दार उघडून त्याचं स्वागत केलं. मुलांची ओळख करून दिली एकमेकांशी. मग आमचं चहापाणी झालं. मला वाटले आता श्रेया खेळायला जाईल. आणि आपण गप्पा मारू.
पण झाल उलटंच श्रेयाने मला विचारलं "मावशी एखाद पुस्तक असेल तर दे ना वाचयला"
बापरे! मी चक्क उडालेच."तू पुस्तक वाचणार, खेळणार नाहीस?" अनभिज्ञपणे माझ्या तोंडून उच्चार निघाले. कारण अशा प्रश्नांची मला  सवयच नव्हती. माझ्या मुलाच्या लहानपणापासून त्याचे किती तरी मित्र माझ्या घरी येत होते. पण असा प्रश्न  विचारणारी हि पहिलीच मुलगी. 


माझे वाटत होते कि टेलिव्हिजन आणि इंटरनेट सुविधांचा उपयोग वाढल्याने पुस्तक वाचण्याची सवय घटली आहे.पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आजकाल मुले पुस्तके वाचण्यासाठी लायब्ररी मध्ये जात नाहीत. त्याच्या project साठी हवी असलेली माहिती इंटरनेटवर शोधतात. पण श्रेयाने माझे डोळे उघडले. मुलांना आपण चांगल्या सवयी लावू शकतो या विचारांची मी. मग हि गोष्ट कशी माझ्या लक्षात नाही आली? आपण काय करू शकतो? असे प्रश्न माझ्या मनात आलेत. मग मी श्रेयाला पुस्तक देऊन प्रियाशी चर्चा केली अर्थातच विषय होता.......... 

How to develop good reading habit in students? 

विद्यार्थांमध्ये चांगल्या वाचनाची सवय कशी विकसित करावी?

  1. मुलांमध्ये अगदी लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करावी.  
  2. लहानपणी जेव्हा आपण मुलांना गोष्टीचे पुस्तके वाचून दाखवतो, त्यावेळी आवाजातील  चढ-उतार, नाट्यमय पद्धत, हावभाव इ. गोष्टींचा वापर करावा.
  3.  मुलांना activity book सोबत  audio book, interactive book हि आणून द्यावेत.
  4. मुलांच्या मित्रांना घरी बोलावून सामुहिक वाचनाची सवय लावावी.
  5. मुलांचा 'reading club' सुरु करावा. शक्य झाल्यास त्यात लेखक, कवी, शिक्षक, यांना मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवावे. 
  6. मुलांना Book library, Book Fair, Exibition अशा ठिकाणी घेवून जावे. तिकडे त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तक हाताळू द्यावीत.
  7. आपणही  मुलांसमोर रोज किमान 10 min तरी वाचन करावे. 
  8. मुलांसोबत पुस्तकांवर चर्चा करावी. 'आपला वाचनाचा अनुभव कित्ती छान आहे' हे मुलांना सांगावे. 
  9.  सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत बसून आपण पुढल्या आठवड्यात काय वाचायचे ते ठरवा. मुलांना छोटे छोटे goal सेट करून द्या.
  10. वाचलेल्या पुस्तकांची समीक्षा करा. त्यातून आपण काय बोध घेवू शकतो या विषयावर बोला. सारांश लिहायला द्या.
ह्या आणि अशा अनेक activity आपण मुलांसोबत करून त्यांना चांगली पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. हे मला प्रिया सोबत चर्चा करून कळले.

आणि मला खात्री होती कि तुम्हालाही या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल.
बरोबर ना!

मी तर माझ्या मुलामध्ये वाचनाची सवय विकसित व्हावी. म्हणून यातील काही activity सुरु केल्यात. 

तुम्ही कधी करताय. आज मुहूर्त पण छान आहे, करा मग सुरु. 
आणि काही मदत लागलीच तर मी आहेच. 

चला लागा कामाला, मलाही माझ्या मुलासोबत Book Library मध्ये जायचे आहे. 

परत भेटूच एक नवीन विषय घेवून. 

Bye 


.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...