Monday, 20 November 2017

"मै कर सकती है"

 Please Share

नमस्कार वाचकमंडळी 

कसे आहात सगळे. मजेत ना! 


मस्त गुलाबी थंडी पडायला सुरवात झाली आहे. सगळ्यांसारखाच मलाही पहाटेच्या  'साखरझोपेतून' उठण्याचा कंटाळा येतो. जाग येऊनही अंथरुणातच  पडून रहावेसे  वाटते. रोजचा व्यायाम, योगासने, नंतरची स्वयंपाक घरातील काम  तर नकोशी वाटतात. 
मग  अंथरुणातच माझ्या स्वप्नांच्या दुनियेची सफर सुरु होते. मध्ये कोणाचा व्यत्यय नको म्हणून मग  मी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपण्याचे नाटक  करते.







ही माझी स्वप्नांची दुनिया फार छान असते, एक समारंभ सुरु असतो. एक मोठठ व्यासपीठ असत. दोन मोठे सेलिब्रिटी anchoring करत असतात. व्यासपीठावर छानशी एक Trophy घेऊन एक नामांकित व्यक्ती उभी असते. आणि announcement होते. & The prize goes to ..........






तेवढयात माझ्या लाडक्या युवराजांचा आवाज येतो "मम्मा, आज टिफिन मध्य काहीतरी छान करून दे, भाजीपोळी, पराठे, थालीपीठ, इडली-डोसा,  आंबोळी असं नेहमीच नको." 



'झालं! हीच ती वाक्य असतात जी मला काही करण्यापासून थाबवतात,माझ्या यशापासून मागे खेचतात. नाही तर मी आज कुठल्या कुठे असते हा विचार माझ्या मनात येतो'. 



"हो रे माझ्या राजा,  छान काहीतरी करून देते." असं म्हणत मी त्यालाही माझ्या पांघरुणात ओढते. आणि माझा अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण आता ते माझ अपूर्ण स्वप्न मला दिसतच नाही. माझ्या विचारांचं चक्र आता दुसरीकडेच फिरत असते. 'आज Breakfast मध्ये काय बनवायच? lunch मध्ये काय भाजी करू? चला लवकर उठून आवरायला पाहिजे. आज दुपारी दवाखान्यातही जायचे आहे. पुढल्या आठवड्यात दोन लग्नांना जायचे आहे. त्याही साडीवर matching आणायला जावे लागेल.' ह्या आणि अशाच विचारांनी मी पांघरून बाजूला सारून उठते आणि माझ्या कामाला लागते. 



अशी माझ्या सारखी मोठ-मोठी यशाची स्वप्नं खूप लोकं बघतात पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची धमक फारच थोड्या लोकांमध्ये असते. स्वप्न आणि सत्य या दोन मधला जो एक Bridge असतो तो पार करण्याची हिम्मत काहीच लोक दाखवतात. असं नाही कि आपल्यात क्षमता नसतात. पण त्या योग्य पद्धतीने वापरण्याची आपली तयारी नसते. आपण Safe zone  सोडण्यास घाबरतो. आणि  कारण सांगायला सुरवात करतो.



अडचणी तर काय सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण आपण त्यावर मात करून पुढे जायचे कि त्यांना कुरवाळत बसायचे ते आपण ठरवायचे असते.

यश मिळवायचे म्हणजे परिस्थितीशी झुंज द्यायची तयारी पाहिजे.  







डोळ्यात स्वप्नं  आणि "मै कर सकती है" हा आत्मविश्वास असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू  शकत नाही.





यशस्वी होणे म्हणजे काय तर परीक्षेतील गुणवत्ता, शिक्षणातील डिग्री, चांगली नोकरी, लठ्ठ पगार, त्यामुळे दाराशी येणाऱ्या महागड्या गाड्या, bank balance, सोन्याचांदीचे दागिने घालून मिरवणे. थोडक्यात काय चैनीचे जीवन जगण्याची ऐपत असणे म्हणजेच यश अशी आपली समजूत असते. आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी  लोकांची उदाहरण आपण पाहत असतो. 



पण तेच  खरे यश आहे असे तुम्हाला वाटते का?


आता उदाहरणादाखल सांगायचे झाले तर समजा एखाद्या कडे वरील सर्व गोष्टी आहेत पण त्याची health  चांगली नसते. तर तो या सगळ्यांचा उपभोग घेऊ शकेल का? तो त्याच्या आयुष्यात आनंदी असेल का?
मग त्याला यशस्वी म्हणायचे का?

आज गेली 17 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात वावरते  आहे. विद्यार्थांच्यातोंडून बरेचदा एकले आहे 'Madam, जिवनात खूप यशस्वी व्हायचे आहे.' मग मी त्यांना विचारते म्हणजे नेमके काय करणार आहात?' त्याची उत्तरे मात्र मुलांजवळ नसतात.  
यश म्हणजे काय हे न समजताच, त्यांना यशस्वी व्हायचे असते. आणि मग परीक्षेतील यश म्हणजेच आयुष्यातील यश असे समीकरण तयार होते. जे सर्वस्वी चुकीचे आहे.
तर  आज आपण ‘यश’ म्हणजे काय ते जाणून घेवूया.  

जीवनात ध्येय निश्चित करणे. आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करणे म्हणजेच  यश मिळवणे होय. 

ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नेहमीच अपेक्षित यश मिळेलच असे  नाही, काही वेळा आपण अपयशी ठरतो. समजा एका  विद्यार्थांने आपले ध्येय परीक्षेत 90% मार्क्स मिळवण्याचे ठरवले पण तो ते मिळवू शाळा नाही तर तो अपयशाने  खचून जातो. निराश होतो. कुटुंबाच्या आणि समाजाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाहीत ,आता जगण्यात काही अर्थ उरला नाही त्याला असे वाटू लागते आणि आत्महत्येचे विचार येतात आणि काही जण तसा प्रयत्नही करतात.
पण हा काही समस्येवरचा उपाय नाही.

स्वप्ने पाहणे, मोठी  ध्येय ठेवणे योग्यच आहे.  पण ध्येयपूर्ती साठी   सातत्याने, नियोजनपूर्वक जर  प्रयत्न केले तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आता वरील विद्यार्थ्यांचेच उदाहरण घेवू या. त्याचे ध्येय परीक्षेत 90% मार्क्स मिळवण्याचे आहे. त्याची  बौद्धिक क्षमताही आहे. पण त्याने त्याचा सगळा वेळ Mobile game खेळण्यात घालवला तर त्याला यश मिळेल का? म्हणजेच जर प्रयत्नात सातत्य नसेल, वेळेचे नियोजन केले नसेल तर त्याला यश मिळणार नाही हे नक्की. 
अशा वेळी आपण आपल्या ध्येयपूर्ती साठी किती प्रयत्न केले हे याचे मूल्यमापन होणे गरजेचे असते.

आपल्या कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मनात positive विचार ठेवले की यश हमखास मिळते. 

अपयशानंतरही आत्मविश्वास कायम असेल  तर आपण परिस्थिती बदलू शकतो. आता त्या विद्यार्थ्यांने अपयशाला तोंड देताना आत्मपरीक्षण केले, आपला वेळ mobile game मध्ये न घालवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर त्याला यश नक्कीच मिळेल.

कमतरतांबरोबर आपल्यातील चांगल्या गुणांचे सतत स्मरण ठेवले तर आत्मविश्वास वाढतो. आणि यश हे मिळतेच. 

 यश ही एक वृत्ती आहे ती काही एखादी  घटना नाही. त्यामुळे जर एखाद्या परीक्षेत जर अपयश मिळालेच तर ती परिस्थिती हाताळायचे कौशल्य आत्मसात करा. आणि अभ्यासाला लागा.

Open the following link and read about 50 famous people who failed at their first attempt.


अजूनही वेळ गेलेली नाही. यश मिळवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो, त्याची यादी खूप मोठी आहे. पण आपण  पुढील 10 गोष्टींपासून सुरवात करूया.

  1. तुमचे ध्येय निचित करा. ध्येयपूर्ती दृष्टीने प्रयत्न करा. 
  2. आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी काय अडचणी  येवू  शकतात याची यादी करा. आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा.
  3. स्वतःवर विश्वास ठेवा.
  4. स्वतःच्या क्षमता ओळखा.
  5. वेळेचे नियोजन करा.
  6. अवांतर वाचन करा. 
  7. कोणत्याही अपयशाची कारण सांगू नका, तर आत्मपरीक्षण करा आणि आपल्या कमतरतांवर मात करा.
  8. Yoga, meditation, exercise करा.
  9. Risk घ्यायला शिका.
  10. Positive विचार करा.
आणि मग बघा यश तुमचेच आहे. 

चला लागा कामाला आणि काही विचारायचे असेल तर मी आहेच. 
लवकरच परत भेटू.......




x

No comments:

Post a Comment

.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...