Monday, 30 October 2017

Learning Style

Please Share

नमस्कार

धन्यवाद


माझ्या पहिल्याच ब्लॉगला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या  कौतुकाच्या वर्षावात मी अगदी न्हाऊन निघाले. खूप छान वाटतंय,पण त्याचं बरोबर आता माझी जबाबदारी वाढल्याची जाणीवही आहे. तुमच्याकडून फोनवरून आलेल्या सूचना, अभिप्राय यांचे स्वागतच आहे. आणि त्यानुसार बदलही होतील.


चला आता जास्त ताणून न धरता आपण आपल्या विषयाकडे  वळूया.

मागील blog मध्ये म्हटल्याप्रमाणे आजचा आपला विषय 'Learning style' हा आहे. या मध्ये आपण  
  • Learning style म्हणजे काय?
  • Learning style चे प्रकार.
  • त्यानुसार अभ्यास केला तर काय फायदा होतो? 
  • तुमची learning style कोणती? आणि ती कशी ओळखायची?
  • प्रत्येक  learning style नुसार study tips.
या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पण विषयाला सुरवात करण्यापूर्वी एक अनुभव सांगण्याची इच्छा होत आहे. 


नेहा इयत्ता तिसरीत शिकणारी एक गोंडस मुलगी. शाळेत नियमित येणारी, गृहपाठ पूर्ण करणारी, नीटनेटकी, हसरी, आणि विशेष म्हणजे आईने दिलेला डबा संपवणारी. त्यामुळे आईची आणि शाळेतल्या शिक्षकांची अत्यंत लाडकी. नेहाला मी कधीही एका जागेवर बसलेल पाहिलं नाही. अशी ही नेहा पडलेल्या चेहऱ्याने समोरून येताना दिसली. न राहवून मी तिला विचारले "काय ग नेहा काय झाले?" माझ्या या वाक्याने नेहाचे डोळे भरून आले. रडक्या आवाजात तिने उत्तर दिले. "बाई, गुणाकार जमत नाहीत. शाळेत सरांनी शिकवले घरी आईने पण समजावले तरीही चुकतात. सगळेच ओरडतात मग माझ्यावर, आता नाहीच कळत आहे मला तर मी तरी काय करू? मी काय मुद्दाम करते आहे का? आता मला विषय कळला, मी नेहाला घेऊन माझ्या केबिन मध्ये आले.           

प्रत्येक मूल हे वेगळे असते. काही ना काही वेगळ्या क्षमता घेऊनच जन्माला आलेलं असतं. मग प्रत्येकाची शिकण्याची शैली एकच कशी असेल? अशा वेळी गरज असते ती त्याची अध्ययन शैली ओळखण्याची आणि त्यानुसार त्याला अध्ययन अनुभव देण्याची. याचे उदाहरण आपण 'तारे जमीन पर ' या सिनेमात पहिलेच होते.




जर मूल तुम्ही शिकवलेल्या पद्धतीने शिकत नसेल तर तुम्ही मुलाची शिकण्याची शैली ओळखून त्या पद्धतीने शिकवा. आणि मग फरक बघा.



Learning Style\अध्ययन शैली\शिकण्याची शैली म्हणजे काय?

Learning style is an individual's unique approach to learning based on strengths, weaknesses, and preferences. 


-Dictionary.com's 21st Century Lexicon. Copyright © 2003-2014 Dictionary.com, LLC.  



मानवी मेंदूची स्मरणक्षमता सरावाने आणि योग्य तंत्रांचा वापर केल्याने वाढते हे जरी खरे असले तरी त्यात अध्ययन शैलीचा महत्वाचा हातभार असतो. त्यामुळेच आपल्या मुलांची अध्ययन शैली ओळखणे खूप गरजेचे असते.अमेरिकेत झालेल्या एका संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की जर मुलांची अध्ययन शैली ओळखून त्यांना शिकवले तर त्यांचा performance  साधारणतः 60% पर्यंत वाढू शकतो. प्रत्येकाची information processs करण्याची पद्धत वेगळी असते. काही मुले वाचून पटकन लक्षात ठेवू शकतात तर काहीना ती संकल्पना प्रत्यक्ष करून पहिल्या शिवाय कळतच नाही. 


मुख्यतः तीन प्रकारच्या अध्ययन शैली (Learning Style)असतात.

  • Visual learning style.(V)
  • Auditory learning style.(A)
  • Kinesthetic learning style.(K)

आपल्या मुलाची Learning Style कोणती हे समजून घेणे फार महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे त्यांना माहिती, विविध संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होते. आणि त्या दीर्घकाळ लक्षात राहतात.

चला तर आता आपण एकेक Learning Style समजून घेवूया आणि त्याप्रमाणे आपण कोणत्या activity चा वापर करू शकतो हे पाहूया.


Visual learner

अशी मुले जी पाहून ती माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेवू शकतात. या प्रकारतील मुले एखाद्या व्यक्तीचा चेहरा लक्षात राहतो पण नाव विसरतात अशी असतात. ह्या मुलांचा अभ्यास घेताना संकल्पनेचा संबंध चित्रासोबत जोडला तर लवकर लक्षात राहते. माहिती वाचण्यास आणि त्यास खाली लिहिण्याची परवानगी असल्यास मुलाला अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.

Study tips for visual learner.
  • Making Flash card.
  • Use higlighter pens to "Color code" information
  • Replace words with symbols or initials.
  • Use symbols, pictures and diagrams to susummarize the information
  • Demonstrate the concept, Experiment.
  • Use Power-Point presentation, films, videos, maps, charts, posters while teaching.
  • At home make mind map and place them in highly visible places for easy reviewing.

Auditory learner

जी मुले ऐकून चांगल्या प्रकारे शिकू शकतात. अशा मुलांची श्रवण क्षमता खूप चांगली असते. त्यांना दिलेल्या सूचना व्यवस्थित लक्षात राहतात. हि मुले नावे लक्षात ठेवतात पण चेहरे विसरतात. ह्या मुलांना मोठ्याने वाचण्याची मुभा द्यावी किंवा आपण त्यांना वाचून दाखवावे. म्हणजे ते त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहते. त्यांना प्रश्न विचारावेत. उत्तरावर चर्चा करावी. प्रमुख मुद्दे परत परत सांगावेत.

Study tips for auditory learner.
  • Use audio books beacuse audio books are more helpful for them than paperback books.
  • Make your own audio recordings while reading your notes and text book ,information , new concept onto a recorder. Listen this recording whenever is possible.
  • Repeat facts with eyes closed.
  • Join a study group. Take active participitaion in group discussion.
  • Listen music while studing. It is also help these children to increase concentration and recall memory.

Kinesthetic learner


जी मुले kinesthetic learner आहेत अशा मुलांना प्रत्यक्ष कृती करून पाहणे. त्या गोष्टीला स्पर्श करणे,हाताळणे यात रस असतो. त्यामुळे त्यांचे आकलन चांगले होते. अशा मुलांना वाचण्यापेक्षा व्यावहारिक प्रयोगाद्वारे शिकणे अधिक उपयुक्त ठरू शकते.
Study tips for kinesthetic learner.

  • Conduct "Hands-on" sessions.
  • Using large diagrams, floor/wall puzzles and large maps on the wall or floor are more helpful.
  • Organise field trips and trial-error assignments.
  • Field work out side the class room will create more interest in the studies.
  • Put plenty of examples in your summarition.
  • Study in 20minute time intervals, with5-10 minute breaks.
  • Acting, interviewing, skits and role playing enhance learning.

आता तुम्हालाही कळले असेलच कि नेहाची learning style कोणती होती आणि तिला कोणत्या प्रकारे शिकवायला हवे होते.

अगदी बरोबर!! नेहा kinesthetic learner होती. आणि तिला प्रत्यक्ष कृतीतून शिकवायला हवे होते. मग मी काडी पेटीचा वापर करून तिला या पद्धतीने शिकवले.
 

मग काय नेहा अगदी हसत हसत माझ्या केबिन बाहेर पडली. कारण आता तिचा गुणाकार कधीच चुकणार नव्हता.
आता तुम्हीही तुमच्या मुलांना त्यांच्या learning style नुसारच शिकवणार ना!

आणि अगदीच काही गरज पडली तर मी आहेच.

लवकरच एक नवीन विषय घेऊन परत भेटू.


.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...