Please Share
कोणाच ऐकायच आणि कोणाच ऐकायच नाही हे हि समजण्याचे वय नसते. बरेचदा आईवडील तर शत्रूच वाटत असतात. आणि मित्र जवळचे. पण त्यांचेही ज्ञान तेवढेच. अशावेळी तंत्रज्ञान आपली भूमिका चोख बजावत असते. आजच्या आर्थिकदृष्टीने प्रगत असलेल्या काळात मुलांचा बराचसा वेळ हा इलेक्ट्रॉनिक्स ग्याझेट वर जातो. पण ते शाळा कॉलेजचे प्रकल्प सुद्धा याच साहाय्याने करत असतात. त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील इथेच शोधत असतात. आता हि उत्तरे कितपत बरोबर असतात हा विषय वेगळा.
नमस्कार .........
कित्तीतरी दिवसांपासून मनात होत ब्लॉग सुरु करावा पण मुहूर्त काही लागत नव्हता. आज दसरा म्हणजेच विजयादशमी. साडेतीन शुभ मुहर्तापैकी एक. मनात विचार आला,आजपासूनच या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करूया. गेली १७ वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात काम करते आहे. या १७ वर्षांच्या अनुभवातून बरंच काही शिकले. यातूनच बदलत्या समाजाचा बदललेला चेहराही पाहायला मिळाला. पालक, शिक्षक, शाळा, विद्यार्थी, त्यांचा अभ्यास, परीक्षा, त्यांना येणाऱ्या अडचणी, मूल्यमापन यातच इतकी रमले कि तेच माझ विश्व झाल. आणि आता तेच उलगडायचं ठरवलय. त्यातल्या गमती जमती सांगायच्या, लागलेली बोच बोलून दाखवायची. आणि ज्या प्रश्नांची उत्तरें मला मिळाली नाही ती तुमच्या कडून मिळवायची. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करायचे. आणि पालकांशी हितगुज साधायचे. त्यांना मुलांच्या बाबतीत येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडवायला मदत करायची. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला समस्या ह्या असतातच. पण प्रत्येकाची प्रत्येक समस्या सोडवण्याइतकी मी मोठी नाही. माझा हातखंड फक्त शिक्षण क्षेत्रात. मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे, त्यावर उपाययोजना करणे. त्यांना मार्गदर्शन करणे एवढच मला जमते. तर मग या समाजाचा एक घटक म्हणून समाजासाठी काही चागलं करण्याची, चांगले विचार रुजवण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे. मग मला असलेल ज्ञान शेयर का करू नये? कदाचित त्यामुळे एखाद्याला योग्य दिशा मिळेल, हाच विचार.
म्हणून ही सुरुवात. जीवनातील एक Strong Anchor बनण्याचा एक छोटासा प्रयत्न. माझा हा पहिलाच ब्लॉग. अर्थात माझ्या या धडपडणाऱ्या पावलांना तुमच्या मौल्यवान मार्गदर्शनाची गरज तर आहेच. चुकल दुरुस्त करा.बरोबर असेल तर कौतुकाची थापही द्यायला विसरू नका. कारण तोच तर माझा बुस्टर असणार आहे.
आज पहिल्या ब्लॉगच्या निमित्ताने लिहायला तर मी जोशात सुरवात केली. पण काय काय लिहू असं झालय. आठवणींचा सारखा पाऊस पडतोय. त्याच्यासाठी कोणता वायपर उपयोगात आणायचा हेही मला कळत नाही आहे असो.
व्यक्तीच्या जीवनात जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी निश्चित असतात. आणि या दोन मधला प्रवास म्हणजेच जीवन. हे जीवन जगताना निसर्ग नियमानुसार वाढ होत असते. परंतु त्याचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मुलाचा सर्वांगीण विकास साधण्याच शिवधनुष्य पालक, शिक्षक आणि शाळा यांना उचलायचे असते. प्रत्येक व्यक्ति हा वेगळा असतो. त्याच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी देणगी हि देलेलीच असते. गरज असते ती ओळखण्याची आणि त्यानुसार त्याला अध्ययन अनुभूव देण्याची, आणि त्याचे व्यक्तिमत्व घडवण्याची.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात हि गोष्ट शाळेत काही शक्य नाही. परंतु घरात दोन किंवा तीन मुले असल्यामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी हे करणे सहज शक्य आहे. बरेचशे पालक करतात देखील. त्यांचा पूर्ण फोकस हा त्यांचा मुलांवर असतो. परंतु संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे कि, भारतातील पूर्व कुमारवस्थेतील (म्हणजेच वयोगट १३ ते १६) ८०% विद्यार्थी हे तणावाखाली आहेत. आणि ह्या तणावाच मुख्य कारण म्हणजे पालक, शिक्षक आणि समवयस्क मित्र. या काळात मुला-मुलींचा शारीरिक आणि मानसिक विकास जलद गतीने होत असतो. खर तर हा जीवनाच्या वळणावरील अतिशय महत्वाचा टप्पा. जो व्यक्तीच्या पुढील आयुष्याचा मार्ग ठरवत असतो. या अवस्थेतील मुलांना हाताळणे पालकांसाठी फार कठीण असते. मानसशास्त्रज्ञ तर या कालखंडाला संक्रमणाचा कालखंड म्हणतात.
कुमारावस्थेतील विद्यार्थाना तर बरेच चॅलेंजेस असतात. वरील विधान जरी १९०४ मध्ये केलेले असले तरी आजही हे लागू पडते. मुलांमध्ये शारीरिक, भावनिक बदल तर होतच असतात. ते तर नैसर्गिकच आहे. या वयात मुले बालही नसतात आणि प्रौढही नसतात. त्यांना कोणी लहान म्हटलेलं आवडत नाही. त्यांना प्रौढाच्या जीवनातील ज्ञान मिळवायचे असते. करीयरच्या नव्या वाटा शोधायच्या असतात. अत्यंत गोंधळलेली अवस्था असती ही.
![]() |
| क्या करे, क्या ना करे, कैसी ये मुश्कील हाय!!!!!! |
कोणाच ऐकायच आणि कोणाच ऐकायच नाही हे हि समजण्याचे वय नसते. बरेचदा आईवडील तर शत्रूच वाटत असतात. आणि मित्र जवळचे. पण त्यांचेही ज्ञान तेवढेच. अशावेळी तंत्रज्ञान आपली भूमिका चोख बजावत असते. आजच्या आर्थिकदृष्टीने प्रगत असलेल्या काळात मुलांचा बराचसा वेळ हा इलेक्ट्रॉनिक्स ग्याझेट वर जातो. पण ते शाळा कॉलेजचे प्रकल्प सुद्धा याच साहाय्याने करत असतात. त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील इथेच शोधत असतात. आता हि उत्तरे कितपत बरोबर असतात हा विषय वेगळा.
तंत्रज्ञानाचे फायदे सुद्धा आहेत आणि तोटे सुद्धा. आपण या काळात तंत्रज्ञानाला डावलू शकत नाही. पण योग्य तो वापर तर करूच शकतो. हे एक अस्त्र आहे कि ज्यामुळे आपण एखाद्याचे प्राणही घेऊ शकतो आणि संरक्षणही करू शकतो. काय करायचे ते आपण ठरवायचे असते. जर आपण या तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करून आपला अभ्यास सोपा केला तर ? मज्जा ना! करायचा का मग असा अभ्यास? ठरवा आणि मला सांगा. कसं तर हे मी तुम्हाला अजिबातच सांगायची गरज नाही आहे. तुम्ही तेवढे स्मार्ट आहात हे मला चांगलच माहिती आहे. घ्या मग माझा मोबाईल नंबर 8879513587.
तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करून आपला अभ्यास सोपा कसा करायचा? अभ्यासाच्या, स्मरणशक्ती वाढवण्याच्या युक्त्यांचा वापर करून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे? हे आपण पुढील काही लेखात पाहूच. पण त्यापूर्वी learning style म्हणजे काय? त्यानुसार अभ्यास केला तर काय फायदा होतो? तुमची learning style कोणती आणि ती कशी ओळखायची? हे बघू.
तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहते आहे.



great vaishali. khup chhan mahiti. keep it up.
ReplyDeleteThank you mam
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteFirst of all hertaly Congratulations Madam for this effective start-up! I Respect your spontaneous efforts for educational guidance and parenting stuff.I follow always your guideline about parenting, hence it's more helpful platform than WhatsApp so hope u can reach maximum people around. Keep it up!
ReplyDeleteThank you Sir
DeleteVery nice,,Good One Akka Keep It up
ReplyDelete