Friday, 1 May 2020

Benefits blogging for SME Part -1

Please Share


Hello Friends 

Blogging is one of the most effective ways to build brand awareness while providing relevant and useful content to your target audience is through consistent blogging.

How?

Let's see


उद्योग(मग तो छोटा असो कि मोठा ) म्हटले  कि मार्केटिंग आलेच.

मार्केटिंग साठी उद्योजक  सतत काही ना काही activity करतच असतात. त्यातूनच त्यांची ओळख तयार होत असते. 

असे म्हणतात Brand ची खरी ओळख हि संस्थापकांच्या विचारसरणीत दडलेली असते. 

आता याचे उत्तम उदाहरण म्हणजे Tata.
Tata चे सर्व प्रोजेक्ट हे देश हिताच्या उद्देशाने उभे राहिलेले आहेत.
आजही देशावर काहीही संकट आले तर Tata मदतीसाठी सर्वात पुढे असतात. असो.

उद्योजक स्वतः पेक्षाही इतरांचा विचार जास्त करत असतो. तो स्वतःबरोबर इतरांचेही घर चालवत असतो. त्याचे सहकारी, staff हे देखील त्याचे कुटुंब असतात. 

बरेचदा गरजेतून उद्योग उभे राहतात. पण त्यात पण समाजातील गरज ओळखून, त्यावर  उपाय देणे हाच उद्देश असतो.

उदाहरण बघूया. 
भारतातील 70% जनतेची दिवसाची सुरुवात चहाने होते. 
प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत सारखीच असते. 
पण प्रत्येक चहाची चव वेगळी, यात चहा पावडर चा Brand महत्वाचा असतोच. 

पण त्याच बरोबर वापरण्यात येणारा चा मसाला हि तितकाच महत्वपूर्ण असतो. 
आता जर कोणाला हा चहा मसाला उत्तम बनवता येत असेल आणि त्यांनी याचा उद्योग करण्याचे ठरवले तर हि खरच खूप अभिमानाची गोष्ट असते. 

आता आपण काही पूर्ण भारतात चहा पिकवू शकत पण चहा मसाला मात्र निश्चितच पुरवू शकतो.

आपले Product उत्तम आणि दर्जेदार असले तरी आपला ग्राहक वर्ग तयार होणेही तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी करावे लागणारे मार्केटिंग हि खर्चिक असू शकते.

अशावेळी Blogging खूप महत्वाचे ठरते.
हे एक शून्य खर्च असलेले माध्यम आहे.
कसे ते पाहूया

त्यापूर्वी Blogging म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दात समजावून घेयू या!

उत्तरआहे.


अगदीसोप्या शब्दात सांगायचे तर........
ब्लॉग (Blog) हा शब्द वेब लॉग (Web + log) या शब्दावरुन निर्माण झाला आहे.
  
Blog मुळे  आपल्या पैकी प्रत्येकाला बातमीदार, लेखक आणि प्रकाशक होणे शक्य झाले आहे. 
ब्लॉग ही एक विशिष्ट प्रकारची वेबसाईट असते ज्यात आपण अनौपचारिकरित्या आपले विचार प्रकाशित करू शकतो.

उद्योजक/ व्यावसायिक/शिक्षक/समाजसेवक/कलाकार/विषय तज्ञ समाजातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ब्लॉग लिहू शकतात तर एखादे आजोबाही त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी ब्लॉग लिहू शकतात. 

थोडक्यात काय तर तर ब्लॉग कोणी लिहावा याला बंधन नाही. 

तसे तर ब्लॉग चे अनेक फायदे आहेत. पुढचे काही आठवडे आपण सर्व ह्या ब्लॉग्सच्या दुनियेचा फेरफटका मारणारच आहोत. 

आज आपण ब्लॉग चा  उद्योजकांना कसा फायदा होतो ते बघूया.
उद्योजकाने ब्लॉग का लिहावा?
  1. Brand Awareness. 
  2. Establish Your Business As An Industry Leader.
  3. Build a network
  4. Develop And Strengthen Relationships With Existing And New Customers.
  5. Bring Clarity in thoughts which will help in Decision Making.
  6. Makes You An Industry Expert.
  7. Create New  Opportunities. 
  8. Tell Your Brand Story.
  9. Reach Globally.


If you are interested in increasing your online exposure, while establishing yourself as an expert in your industry, then you will definitely want to take advantage of blogging as a marketing strategy. 

या विषयी सविस्तर चर्चा आपण पुढील भागात करूच ..........पण तोपर्यंत तुम्हाला जर आमच्यासोबत संपर्क करायचा असेल तर तुम्ही 8879513587   WhatsApp करू शकता.
किवा 

Web search –  gyanmudraeducation.org
 Follow us on FB/Insta/Utube – gyanmudraeducation  

लवकरच परत भेटू.

धन्यवाद

2 comments:

.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...